
रामटेक : रामटेक वनपरीक्षेत्रातील सत्रापूर गावात वाघाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. वाघाच्या धुमाकुळामुळे शेतकरी शेती करायला घाबरत असून, गावकऱ्यांनी वनविभागाने वाघाला पकडून परिसराबाहेर नेण्याची आणि त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.