स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून अन्नत्याग सत्याग्रह | nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून अन्नत्याग सत्याग्रह

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून अन्नत्याग सत्याग्रह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आंदोलनाची हाक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. उद्या (ता. १७) पासून देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर येथील संविधान चौकात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बेमुदत सत्याग्रहाला सुरवात केली जाणार आहे.

गुरुवारी (ता. १८) मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावातील शेतकरी गावात फेरी काढून चावडीवर किंवा पारावर धरणे व ठिय्या आंदोलन सुरु करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी (ता. १९) नोव्हेंबर रोजी संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात रास्तारोको आंदोलन केले जाईल. शनिवारी (ता. २०) नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावात गावबंद आंदोलन केले जाणार आहे. या उपरही या आंदोलनाची दखल न घेतल्यास २१ नोव्हेंबरपासून कायदा हातात घेऊन आंदोलनाचा भडका उडविणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी पक्ष भेद विसरून शेतकरी म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी केले आहे.

loading image
go to top