

Nagpur District
esakal
सावनेर: विदर्भात वाढत्या तापमानाचा फटका आता जीवघेणा ठरू लागला असून सावनेर परिसरात उष्माघातामुळे मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी (ता. २३) एकाच दिवशी दोन जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चार दिवसांतील ही तिसरी घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.