Nagpur Accident: सावनेर रोडवर रेतीचा घातक ढिगारा; मोटरसायकल स्लिप, १ मृत, १ जखमी
Motorcycle Accident: सावनेर-खानगाव उड्डाण पुलाजवळ रस्त्यावर पडलेल्या रेतीमुळे मोटरसायकल स्लिप होऊन कवडू नथ्थुजी कुमरे (वय ६०) यांचा मृत्यू झाला. १८ वर्षीय अतुल राजू धुर्वे जखमी. सावनेर पोलिस तपास सुरू असून नागरिकांनी रस्त्यावरील धोक्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत.
सावनेर : नॅशनल हायवे मार्गावर खानगाव उड्डाण पुलाजवळ रस्त्यावर पडलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यामुळे मोटरसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी ७.१५ वाजता घडली.