पोषण आहारातील भ्रष्टाचार अखेर उघड

दोन टन तांदळाचे वाहन जप्त : पाच जणांना अटक
Nutrition Corruption Expose
Nutrition Corruption Expose
Updated on

नागपूर : शहरांमधील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या सुसंस्कार बचतगटाद्वारे शासकीय धान्याची विक्री खुल्या बाजारात करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. महापालिकेत पोषण आहाराचे कंत्राट सादर करण्यासाठी अनेक बचत गटांनी खोटे दस्‍ताऐवज सादर केल्याची शंका असल्याने याचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.

अहफाज पठाण वल्द अशफाक पठाण (वय २२, रा. खरबी), चंद्रशेखर प्रभाकर भिसीकर(वय ४५, रा. तांडापेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी (ता.११) चारचाकी वाहनातून (एमएच ३१३६-एए-१६०६) तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून यशोधरानगर येथे अवैधरीत्या तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यांनी सापळा रचून वाहन अडवित चालकाला पकडले. यावेळी वाहनात दोन टन तांदळाची पोती असल्याचे आढळून आले. यावेळी चालक अहफाज पठाण वल्द अशफाक पठाण याला विचारणा केली असता त्याने माल शालेय पोषण आहारासाठी असल्याचे सांगितले. तसेच हा माल चंद्रशेखर प्रभाकर भिसीकर (वय ४५, रा. तांडापेठ) यांचा सुसंस्कार महिला बचतगट येथील असल्याचे सांगून ते यशोधरनगरात राहणाऱ्या मोनू वल्द शमी पठाण (वय ४३, रा.कुंदनलाल गुप्ता नगर)आणि सोनू शमी पठाण (वय ४०) यांच्या सारा ट्रेडर्स या गोदामात घेऊन जात असल्याचे सांगितले.

तपासा दरम्यान पोलिसांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात विचारणा केली. त्यांनी मुलांच्या भोजनासाठी ५० किलो वजनाचे १०० पोते दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बचत गटाच्या किचनमध्ये फक्त ५० तांदळाचे पोते मिळून आले. मोठी अफरातफर निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, दोघांना अटक केली. या प्रकरणातील आणखी ९ आरोपी अद्यापही फरार आहेत.

कागदपत्रे नसताना कंत्राट

महानगरपालिकेच्या मनपाच्या पोषण आहार विभागाने सेंट्रल किचनसाठी निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये ३९ संस्थांनी निविदा टाकल्या होत्या. १२ जुलैला निविदा काढून त्यापैकी ९ संस्थांची शहरातील शाळांमध्ये पोषण आहार देण्यासाठी निवड करण्यात आली. यापैकी काहींनी आवश्यक दस्ताऐवज सादर केले नव्हते. निविदेनुसार अपात्र ठरल्यानंतरही त्यांना कंत्राट देण्यात आले होते.

सुसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

बोगस कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळविल्याने सुसंस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्ष व इतर सदस्यांवर फसवणुकीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता इतर बचतगटांवरही पोलिसांची नजर असून त्यांच्याही कागदपत्रांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com