nishant agarwal
sakal
नागपूर - ब्रह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानातील आयएसआयसोबत उघड केल्याच्या आरोपात वैज्ञानिक निशांत प्रदीप अग्रवाल (वय-३२, रा. नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) याची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. तर, गोपनीय माहिती जवळ बाळगत हलगर्जीपणा केल्या प्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली.