
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलगुरू निवडीसाठी तब्बल एका वर्षानंतर जाहिरात काढण्यात आली आहे. दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून विद्यापीठ प्रभारी कुलगुरूंकडे या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.