आत्‍मसमर्पित नक्षलवाद्यांसह ११७ जोडप्यांचा विवाह

गडचिरोलीत सामूहिक सोहळ्याचे आयोजन
Naxalite Marriage
Naxalite Marriage sakal

नागपूर : मैत्री परिवार संस्‍था नागपूर आणि गडचिरोली पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकी यांच्‍या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे १६ आत्‍मसमर्पित नक्षलवाद्यांसह ११७ आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मैत्री परिवार संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. भेंडे म्हणाले, सामूहिक विवाह सोहळा येत्‍या १३ मार्च रोजी गडचिरोलीतील चंद्रपूर मार्गावर असलेल्या अभिनव लॉन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मैत्री परिवार संस्‍थेच्यावतीने नागपुरात २०१५ साली सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्‍यात ४४ जोडप्‍यांचा विवाह झाला होता.

२०१८ मध्ये गडचिरोली येथे झालेल्‍या सोहळ्यात दोन आत्‍मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकूण १०५ आदिवासी युवक-युवतींचा विवाह झाला होता. २०१९ मध्ये अहेरी येथे पाच आत्‍मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकूण ५५ जोडप्यांचा विवाह झाला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन १३ मार्च रोजी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांच्‍या हस्‍ते होणार आहे. पत्रकार परिषदेला मैत्री परिवार संस्‍थेचे सच‍िव प्रमोद पेंडके, संस्थेच्या गडचिरोली शाखेचे अध्‍यक्ष निरंजन वासेकर आणि पोलिस अधिकारी संदीप पाटील उपस्‍थित होते.

१६ आत्‍मसमर्पित नक्षलवादी

यावर्षीच्या सोहळ्यात नक्षल चळवळीतून बाहेर पडून आत्‍मसमर्पण करणाऱ्‍या १६ युवक-युवतींचा विवाह होणार आहे. याशिवाय मातृपितृ छत्र हरवलेल्या आठ जणांचा तर एकच पालक असलेल्या ४७ मुलामुलींचा विवाह होणार आहे.

समारोहाची वैशिष्‍ट्ये

  • आदिवासी परंपरेनुसार विवाह

  • नवदाम्‍पत्‍याच्‍या मात्‍या-पित्‍यांना भेटवस्‍तू

  • १५ नातेवाइकांच्या भोजनाची व्‍यवस्‍था

  • नववधूला सोन्‍याचे मंगळसूत्र, जोडवे व संसारोपयोगी साहित्‍य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com