एकाच प्लॉटची अनेकांना विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plot

एकाच प्लॉटची अनेकांना विक्री

नागपूर - वाठोडा परिसरात असलेली सरकारी जमिनीजवळ ले-आऊट टाकून एकच प्लॉट अनेकांना विकून २८ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. सेवकराम इकाजी पटेल (वय ५४ रा. पुनापूर रोड पारडी) असे आरोपींचे नाव आहे. त्याची पारडी येथे मानसी हाऊसिंग एजन्सी आहे. त्या माध्यमातून तो प्लॉटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०१६ साली सुनिता नामदेव लवनकर (वय ४०, रा. महाकाली नगर) यांनी मौजा, वाठोडा, प.ह.न. ३४, खसरा नं. १७७ मध्ये प्लॉट खरेदी केला. यावेळी त्यांना नोटरी करुन माध्यमातून कब्जापत्र तयार करुन देण्यात येणार असे सांगितले. त्यासाठी त्यानी ३ लाख ७० हजार रुपये दिल्यावर सेवकराम याने त्यांना १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्लॉटचे कब्जापत्र तयार करुन दिले. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून सुनिता लवनकर या सेवकराम पटेल यांना सातत्याने प्लॉटची मोजणी करण्याची मागणी करीत, त्याची रजिस्ट्री करुन देण्याबाबत विचारणा करीत होत्या.

मात्र, त्यासाठी वेळोवेळी टाळाटाळ करीत असल्याने काही गोलमाल असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी प्लॉटची पाहणी केली असता, तो दुसऱ्याच्या नावे असून तिसऱ्याला विकून २८ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. त्यामुळे वाठोडा पोलिस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली.पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करीत सेवकराम याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर सादर करीत ९ तारखेपर्यंतची पोलिस कोठडी मिळविली आहे.

सरकारी जमिनीवर मालकीचा दावा

वाठोडा परिसरातील खसरा क्रमांक खसरा क्र १७७, १८० मध्ये असलेल्या सरकारी जमिनीलगत सेवकरामने प्लॉट पाडले. यावेळी बाजुचीही जमीन स्वतःची असल्याची माहिती त्याने अनेकांना दिली. त्यातून काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी २ ते ३ किलोमिटर भिंत तयार झाल्याने अनेकांना शंका निर्माण झाली. त्यातून चौकशी करीत सेवकरामचा खोटारडेपणा उघडकीस आला.

Web Title: Selling The Same Plot To Many In Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top