
Police Help for Senior Citizens in Emergencies: एकाकीपण, घरगुती वाद, ताणतणाव, शारीरिक व्याधी हे वृद्धांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. या समस्यांमुळे हार मानून किंवा निराश होऊन जीव देणे पळपुटेपणा आहे. ज्येष्ठांनी टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी समस्यांचा धैर्याने सामना करावा. वेळप्रसंगी पोलिस, प्रशासन किंवा ज्येष्ठ नागरिक कक्षाची मदत घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक व सिनियर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष मनोहर खर्चे व सचिव सुरेश रेवतकर यांनी वृद्धांना केले आहे.