

नागपूर : हेल्मेट घालून प्रवास करणे, हे वाहनधारकांच्या हिताचेच आहे. मात्र विविध आजारांनी ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हे खूपच त्रासदायक आहे. ज्येष्ठांनी गाडीवर बसल्यानंतर हेल्मेट सांभाळायचे की स्वतःला, याचा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असा सवाल करीत, शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दुहेरी ‘हेल्मेटसक्ती’ला तीव्र विरोध केला.