

नागपूर : नागपूरचा वंडरबॉय राघव भांगडे याने अवघ्या एक मिनिट १३ सेकंदात उलट्या हाताने पाच मजली इमारतीच्या तब्बल १०२ पायऱ्या उतरून (चक्रासन) नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. सात वर्षीय राघवचा गेल्या तीन वर्षांतील हा तिसरा विश्वविक्रम ठरला आहे.बाजीप्रभूनगर (रामनगर) येथे रविवारी सकाळी आयोजित विश्वविक्रमी इव्हेंटमध्ये कराटेपटू राघवने १०२ पायऱ्या उतरण्यासाठी केवळ एक मिनिट १३.३० सेकंद इतका वेळ घेतला.
सात वर्षे वयोगटात जगात आतापर्यंत कुणीही असा प्रयत्न केलेला नाही, हे उल्लेखनीय. लवकरच हे रेकॉर्डिंग वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्डस्कडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर प्रमाणपत्र व मेडल प्राप्त होऊन विक्रमावर औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे. राघवने यापूर्वी २०१९ मध्ये एका मिनिटात १२५ टाईल्स फोडण्याचा आणि गतवर्षी एक मिनिट २५ सेकंदात १०२ पायऱ्या चढण्याचा विक्रम नोंदविला होता. राघवचा पराक्रम पाहण्यासाठी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार स्वतः यावेळी उपस्थित होते. याशिवाय पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, राष्ट्रसंत चक्रासनमध्ये विश्वविक्रम नोंदविणारा राघव भांगडे.
या विश्वविक्रमासाठी मी राघवकडून दररोज तीन ते चार कसून प्रॅक्टिस करवून घेतली. पुरेशी तयारी लक्षात घेता तो हा विक्रम करेल, असा मला विश्वास होता. सुदैवाने यात तो यशस्वी ठरला. भविष्यात गिनीज बुकमध्ये नाव नोंदविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- विजय घिचारे, राघवचे प्रशिक्षक
पिता म्हणून मुलाच्या ऐतिहासिक कामगिरीचा मला आनंद व अभिमान आहे. याचे सर्व श्रेय राघवसह त्याला घडविणाऱ्या प्रशिक्षकांनाही जाते. आम्ही ज्या उद्देशाने राघवला खेळात टाकले, तो यशस्वी होताना दिसत आहे. भविष्यातही त्याला आमचा पूर्ण सपोर्ट राहणार आहे.
- ॲड. साहिल भांगडे,
राघवचे आतापर्यंतचे विक्रम
२०१९ मध्ये वयाच्या पाचव्या वर्षी एका मिनिटात १२५ टाईल्स
फोडण्याचा विश्वविक्रम.
२०२० मध्ये एक मिनिट २५ सेकंदात १०२ पायऱ्या चढण्याचा विक्रम
२०२१ मध्ये एक मिनिट १३.३० सेकंदात उलट्या हाताने १०२ पायऱ्या उतरण्याचा विक्रम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.