कन्हान : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली गावाजवळच्या मान हॉटेल लॉजवर कन्हान पोलिसांनी छापा टाकून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. एका पीडित महिलेची सुटका करून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी ६०,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. .गुप्त माहितीच्या आधारे, शुक्रवारी (ता.११) कन्हान पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने सापळा रचला. एका डमी ग्राहकाला मान हॉटेलमध्ये पाठवले. डमी ग्राहकाने हॉटेल मालक रवींद्र रामजनम यादव (४४, रा. वाघोली) याच्याकडे सेक्स वर्करबाबत विचारणा केली असता, त्याने होकार देत १५०० रुपये घेऊन रूम नं. १०४ मध्ये पाठवले. त्यानंतर निश्चित संकेतानुसार पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेला सोडवले..चौकशीतून उघड झाले की, पीडितेच्या अशिक्षितपणा व गरिबीचा फायदा घेत हॉटेल मालकाने तिला देहव्यापारात ढकलले होते. पीडितेला तातडीने सुधारगृह, पाटणकर चौक येथे पाठवण्यात आले आहे..हॉटेल मालक रवींद्र यादवसह दिलीप शालिकराम राऊत (४९, रा. कांद्री) याला अटक करून पोलिसांनी दोघांकडून मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ६०,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. .Black Magic: जादूटोण्याच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा.ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड, पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, अश्विन गजभिये, जीवन विघे, मोहित झाडे, आकाश सिरसाट, आशिष बोरकर व नालंदा पाटील यांच्या पथकाने केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.