
नागपूर : नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक) विद्यापीठाने नागपूरच्या शहाना फातिमाची तिच्या सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यापीठाने उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड केली आहे. यात सात विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून त्यापैकी शहाना एक आहे.