Sharad Bobde : संस्कृतला अधिकृत भाषेचा दर्जा दिला पाहिजे; शरद बोबडे

‘‘संस्कृत ही भारताची अधिकृत भाषा करावी, असा प्रस्ताव खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मांडला होता.
Sharad Arvind Bobde statement Sanskrit should given status of official language nagpur
Sharad Arvind Bobde statement Sanskrit should given status of official language nagpur

नागपूर : ‘‘संस्कृत ही भारताची अधिकृत भाषा करावी, असा प्रस्ताव खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मांडला होता. त्या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनीच उत्स्फूर्तपणे ‘संस्कृतमध्ये चूक काय आहे’, असा प्रतिप्रश्न केला होता.

बाबासाहेबांचा तो प्रश्न आजही अनुत्तरित आहे,’’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले. संस्कृत भारतीतर्फे रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात अखिल भारतीय छात्र संमेलनाचे आयोजन केले आहे.

या संमेलनाच्या उद्‍घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरन्यायाधीश बोलत होते. ते म्हणाले की, आज हिंदी व इंग्रजी या दोन भाषांना देशाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्या घटनेच्या कलम ३४४ नुसार संस्कृतचाही समावेश करता येऊ शकतो.

नव्या राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये संस्कृत संवर्धनावर भर देण्यात आला असून संस्कृतच्या विकासासाठी युवकांनी महत्तम योगदान द्यावे. देवभाषा असणारी संस्कृत, ही मानव जातीला उपलब्ध असणारी, सर्वात सुंदर भाषा आहे.

— तेजस्वी सूर्य, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com