Sharad Pawar Amravati Visit : शंकरबाबाच्या आश्रमाला शरद पवार देणार भेट

अनिल देशमुखांनी घेतला पुढाकार
Sharad Pawar Amravati Visit
Sharad Pawar Amravati VisitSakal

Nagpur News : शरद पवार २७ व २८ डिसेंबर या दोन दिवसासाठी अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहे. याच दौऱ्यादरम्यान परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर आश्रमास भेट देण्यासाठी अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना पत्र दिले होते.

त्यांची ही विनंती पवार यांनी स्विकारली असून ते २८ डिसेंबरला भेट देणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. शरद पवार हे दोन दिवसांचा अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहे. २७ डिसेंबरला ते विशेष विमानाने सकाळी ११ वाजता अमरावती येथे येतील.

यानंतर ते विश्राम गृहात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेवून शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमास दुपारी ४.३० वाजता उपस्थीत राहतील. यानंतर त्यांचा अमवराती येथेच मुक्काम असेल.

२८ डिसेंबरला सकाळी १०.४५ वाजता वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमास भेट देवून तेथील संपुर्ण कार्य व माहिती जावुन घेतील. नंतर दुपारी १२.०० वाजता उपतखेडा येथे आदिवासी संमेलनास उपस्थीत राहणार आहे.

यानंतर अमवराती येथे सायंकाळी पाच वाजता परत येवून विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. गाडगे बाबांचे विनम्र पाईक आणि अनाथांचे नाथ म्हणून ख्यातकीर्त असलेले शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमास शरद पवार साहेब यांनी भेट द्यावी अशी अनेक दिवसांपासुन अनिल देशमुख यांची ईच्छा होती. परंतु योग जुळुन येत नव्हता.

दरम्यान विविध कार्यक्रमासाठी शरद पवार साहेब हे अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर येत असल्याने तो योग जुळवुन आनण्यासाठी अनिल देशमुख यांनी थेट शरद पवार साहेब यांना पत्र लिहुन भेट देण्याची विनंती केली होती हे विशेष.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com