नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शाश्वत भारत सेतू- विनिंग नेट झिरो या केंद्राचे उद्घाटन नागपूरमध्ये नुकतेच केले. हे केंद्र ‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’ने विकसित केले आहे. सर्वांसाठी उपयुक्त अशा शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. त्यातून शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने जाण्यात मदत होणार आहे.
‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’चे संस्थापक आनंद चोरडिया यांनी वेस्ट टू वेल्थ, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत यांसारख्या अनेक संकल्पना मांडल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन कमी कसे करावे, चक्राकार अर्थव्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण, शहरी, औद्योगिक व व्यक्तिगत विभागांत शाश्वतता कशी साध्य करावी हेही स्पष्ट केले आहे. व्यापक स्तरावर शून्य उत्सर्जन कसे साध्य करावे यावर त्यांनी भर दिला.
उदघाटन प्रसंगी गडकरी म्हणाले, ‘अशा प्रकारचे केंद्र सुरू केल्याबद्दल द इको फॅक्टरी फाउंडेशनचे खूप अभिनंदन. शाश्वत भारत सेतूने अगदी महत्त्वाच्या मुद्दयाला स्पर्श केला आहे. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे आणि पर्यायाने वसुंधरेचे संवर्धन होणार आहे. शाश्वत भारत सेतूने ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेने उदाहरण घालून दिले आहे. केवळ पर्यावरणाला लाभदायक ठरणारे नाहीत, तर समाजासाठी उपजीविकेच्या संधीही निर्माण करणारे शाश्वत उपाय हे केंद्र पुरवणार आहे’’
चोरडिया ‘प्रत्येकाला शून्य कार्बन उत्सर्जन करणारी तसेच शाश्वत जीवनशैली सहजतेने स्वीकारण्याची प्रेरणा देण्याच्या तसेच त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी शाश्वत भारत सेतू-विनिंग नेट झिरो हे केंद्र मैलाचा दगड ठऱणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.