

Shegaon Gajanan Maharaj Temple crowd during Christmas holidays
Sakal
शेगांव : नाताळच्या सुट्यांमुळे संतनगरी शेगाव मध्ये हजारो भाविक भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे. श्रींच्या मंदिरात समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन भाविक धन्य होत आहेत. दरवर्षी नाताळ मध्ये सलग सुट्ट्यांमुळे शेगाव येथे राज्यभरातून असंख्य भाविक दर्शनास येत असतात.यंदाही मुंबई ,पुणे ,नागपूर सह राज्यभरातील विविध ठिकाणचे भाविक श्रींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत.