

CM Devendra Fadnavis
sakal
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे २२ आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा केला. त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार उलटवार करत महायुतीतील शिवसेनेचे आमदार घेऊन काय करायचे, असे स्पष्टच सांगितले.