शिवसेनेला आणखी एक धक्का? नागपुरातील संदीप इटकेलवार ‘नॉट रिचेबल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Sandeep Itkelwar not reachable Uddhav Thackeray Meeting

शिवसेनेला आणखी एक धक्का? नागपुरातील संदीप इटकेलवार ‘नॉट रिचेबल’

नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे धक्के आता नागपूर जिल्ह्यालाही बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या राज्यभरातील जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार अनुपस्थित होते. तेही शिंदे गटात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपची (BJP) सत्ता स्थापन झाली आहे. सोमवारी (ता. ४) नव्या सरकारने बहुतही जिंकले आहे. त्यानंतर लगेच शिवसेनेचा (Shiv Sena) आणखी एक आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे यांचे पालकमंत्री या नात्याने गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यात फारसा संपर्क नव्हता. त्यांचा गट आणि समर्थकही नव्हते.

हेही वाचा: आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार? व्हिपच्या विरोधात मतदान

रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल सुरुवातीपासूनच शिंदे गटाशी जुळले होते. त्यांचा अपवाद वगळता विदर्भात बंडाचा फारसा प्रभाव जाणावणार नाही असे बोलले जात होते. मात्र, आता विदर्भातही सेनेला सौम्य धक्के बसू लागले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी झाले गेले विसरून नव्याने सेना उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. संदीप इटकेलवार मात्र बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यांच्याशी अनेकांनी फोनवरून संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने शिवसैनिकांचे (Shiv Sena) म्हणणे आहे. विशेष म्हणजे इटकेलवार रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे कट्टर समर्थक आहे.

हेही वाचा: आंध्र प्रदेश : आंदोलकांनी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ उडवले काळे फुगे

विश्वस्तपद वाचणार?

संदीप इटकेलवार नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आहेत. नागपूरच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे समजले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते कायम राहील अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. इटकेलवार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत गेल्यास आपसूकच त्यांनी एनआयटीवरून गच्छंती होईल. ते टाळण्यासाठी त्यांनी बैठकीला जाण्याचे टाळले अशी चर्चा आहे.

Web Title: Shiv Sena Sandeep Itkelwar Not Reachable Uddhav Thackeray Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..