
महागाव (जि. यवतमाळ) : धारकान्हा या दुर्गम गावात मंगळवारी (ता. १०) मोठे आक्रीत घडले. गावालगत वेणी अधर पूस प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये वीज पडून ४० जनावरे मृत्युमुखी पडल्याची खळबळजनक घटना घडली. महसूल, पोलिस प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी (ता. ११) दुपारी बारापर्यंत ३१ गायी, सहा वासरे आणि तीन वळूंचे मृतदेह धरणाच्या काठावर आढळून आले. अजून दहा पशू बेपत्ता आहेत.