Gajanan Maharaj Dindi : गजानन महाराजांची पायदळ दिंडी शेगावला रवाना

उमरेड रोड येथील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातून रविवारी सकाळी पायदळ दिंडीला शेगावला रवाना झाली.
Shri Gajanan Maharaj Dindi
Shri Gajanan Maharaj Dindisakal

नागपूर - उमरेड रोड येथील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातून रविवारी सकाळी पायदळ दिंडीला शेगावला रवाना झाली. गेल्या २२ वर्षांपासून ही पायदळ यात्रा नागपूर ते शेगाव येथे काढण्यात येते. रघुजीनगरातील स्व. प्रभाकरराव राऊत दादा यांच्या आशीर्वादाने पालखी महोत्सवाला प्रारंभ झाला.

पायदळ दिंडी यात्रा २९ ऑगस्टला शेगावला पोहचणार असून ३० ऑगस्ट रोजी शेगावला श्री गजानन महाराजांना राखी अर्पण करून दिंडी नागपूरला परत येणार आहे. पालखी दिंडी यात्रा २०२२ पासून सुरू झाली. या पायदळ दिंडी यात्रेत दीडशे भक्तांनी सहभाग नोंदविला होता.

जय गजानन श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणला. पायदळ दिंडी यात्रेतील पालखीचे गजानन भक्तांनी दर्शन घेतले. पालखी सर्वप्रथम सिरसपेठमार्गे रवीनगर, दत्तवाडी, पेठ येथून बाजारगावला पोहचली. सोमवारी (ता.२१) बाजारगाव येथील गावंडे कॉन्व्हेंट येथे मुक्काम करून पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.

श्री संत गजानन महाराज मंदिर निर्मल नगरीचे आयोजक सुनील बालपांडे यांच्या नेतृत्वात पायदळ दिंडी यात्रा नागपूरवरून शेगाव करिता रवाना झाली. त्यावेळेस पालखीचे स्वागत लोकसेवा प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक निखिल भुते यांच्या चमूने केले.

दरम्यान, चहा बिस्कीटचे वितरण केले. दिंडी यात्रेत सुनंदा भुते, स्मृतीताई चांदेकर, प्रतिभा प्रधान, मोहन वैरागडे, पंकज बांते, रामदास बालपांडे, दीपक राऊत आणि ज्ञानेश्वरराव सावरकर यांनी पालखीचे स्वागत करून गजानन महाराजांची आराधना केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com