Dr. Babasaheb Ambedkar : आता जय भीम आणि जय श्रीरामचा जयघोष; आज प्रचाराचा सुपर संडे

एकिकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह तर दुसरीकडे श्रीराम नवमी उत्सवाची तयारी यामुळे शहरात जय भीम आणि जयश्रीरामचा जयघोष निवडणूक प्रचाराच्या धुरळ्यात निनादणार.
shri ram navami and Dr Babasaheb Ambedkar birth anniversary
shri ram navami and Dr Babasaheb Ambedkar birth anniversarysakal

नागपूर - प्रचाराचे आता अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने रविवार (ता. १४) सुटीचा दिवस असल्याने भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे विकास ठाकरे, बसपाचे योगिराज लांजेवार या प्रमुख उमेदवारांनी धडक कार्यक्रम आखले आहेत.

एकिकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह तर दुसरीकडे श्रीराम नवमी उत्सवाची तयारी यामुळे शहरात जय भीम आणि जयश्रीरामचा जयघोष निवडणूक प्रचाराच्या धुरळ्यात निनादणार आहे. प्रचाराचा शेवटचा संडे असल्याने तो सुपर ठरणार असल्याचे दिसते.

रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे नागपूरला येत आहे. ते दीक्षाभूमीला भेट देऊन आंबेडकरी जनतेला कुणाला मतदान करायचे याबाबत आवाहन करणार आहेत. दुसरीकडे सायंकाळी गोळीबार चौकात त्यांच्या सभेचे आयोजन केले आहे. विकास ठाकरे सकाळपासूनच जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होणार आहेत.

भाजपच्यावतीने प्रत्येक बुथवर आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. नितीन गडकरी सकाळी नऊ वाजता संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देऊन पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात लोकसंवाद यात्रेत सहभागी होणार आहेत. मारवाडी चौक, प्रेमनगर चौक, कालीमाता मंदिर, भरतवाडा चौक, मोठा सिमेंट रोड, श्याम नगर या मार्गाने पारडी येथील हनुमान मंदिर येथे यात्रा पोहोचेल व याठिकाणी यात्रेचा समारोप होईल.

रामटेकमध्ये तापले वातावरण

रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर आणि कन्हैयाकुमार यांनी शनिवारी येऊन वातावरण तापवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे समर्थिक उमेदवार किशोर गजभिये यांच्यासाठी दोन प्रचारसभा घेतल्या. सुनील केदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कन्हैयाकुमार यांना सभेसाठी बोलावले. मुख्यमंत्र्यांनी येथे दोन सभा घेतल्या. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा रामटेक लोकसभा मतदारसंघात झाल्या आहेत.

साडेतीनशे मंदिरात रामनवमी उत्सव

गडकरी यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शहरात येणार आहेत. भाजपच्यावतीने बुधवारी (ता.१७) प्रत्येक मंदिरात रामनवमी धडाक्यात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे साडेतीनशे मंदिरात जन्मोत्सवाचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे कळते. या दरम्यान संपूर्ण शहर भगवे व राममय करण्यात येणार आहे. हे बघता उद्या जयभीम आणि बुधवारी जय श्रीरामाचा जयघोष होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com