Shyam Manav : धिरेंद्र महाराजांना आव्हान देणाऱ्या शाम मानव यांच्या कार्यक्रमात राडा!

Shyam Manav vs dhirendra maharaj issue youth raised slogans in Shyam Manav program nagpur
Shyam Manav vs dhirendra maharaj issue youth raised slogans in Shyam Manav program nagpur

नागपूर : श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

श्याम माधव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतायेत. आजच्या सभेत त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सध्या धीरेंद्र महाराज हे रामकथा प्रवचनासाठी नागपूरमध्ये आलेले आहेत. यादरम्यान अंधश्रध्दा निर्मुलनासाठी काम करणाऱ्या श्याम माधव यांनी त्यांच्या कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्याविरोधात पुरावे देऊन ही गुन्हा दाखल होत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी राज्यातील अनिसच्या कामाचा उल्लेख देखील केला.

दरम्यान त्यांचे भाषण संपताच अचानक सभागृहात संपुर्ण शांतपणे बसलेल्या तरुणांनी जागेवर उभे राहुण घोषणा द्यायला सुरू केली. श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांची कुठलीही पोलखोल केली नसल्याचा आरोप केला. हिंदू धर्माला बदनाम केल्याचा आरोप त्या तरुणांकडून करण्यात आला.

Shyam Manav vs dhirendra maharaj issue youth raised slogans in Shyam Manav program nagpur
Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये

झालं काय होतं?

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिलं होतं. धीरेंद्र महाराज यांनी दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते.

Shyam Manav vs dhirendra maharaj issue youth raised slogans in Shyam Manav program nagpur
Pune Bypoll Election: पुणे अन् चिंचवडची पोट निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार धीरेंद्र महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर श्याम मानव यांची सभा सुरू होती, धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करण्यासाठी ही सभा घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com