
अमरावती : विदर्भातील विशेषतः आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पूरक व्यवसायासाठी रेशीम शेतीचा पर्याय आहे. या व्यवसायास चालना मिळावी, यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजाराला आता टाळे लागण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय दुर्लक्षासह रेशीमचा दर्जा व भाव, यामुळे हा बाजार अडीच वर्षांतच हेलकावे खाऊ लागला आहे.