
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी संस्थाचालकांचे अटकसत्र सुरू झाले आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर गोंदियातील संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली. यानंतर शनिवारी (ता.१४) सायबर पोलिसांनी मोहप्यातील दिलीप धोटे (वय ६०) या संस्थाचालकाला पाच शिक्षकांच्या बोगस आयडी तयार केल्याप्रकरणी दुपारी अटक केली. ते मोहपा येथील विठ्ठल रुक्मिणी उच्च प्राथमिक शाळेचे संस्थाचालक आहेत.