Nagpur Crime: ‘झुंड’फेम प्रियांशूचा खून; अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले होते काम
Nagpur News: झोपडपट्टी फुटबॉल खेळाडू प्रियांशू छेत्रीचा जुने वादातून मध्यरात्री निर्घृण खून झाला. प्रा. विजय बारसे यांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला तरी दुर्दैवाने प्रियांशू मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही.
नागपूर : झोपडपट्टी फुटबॉलचे (स्लम सॉकर) प्रणेते प्रा. विजय बारसे यांनी वाम मार्गाला लागलेल्या शहरातील अनेक तरुणांना फुटबॉलच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.