विहिरीत डोकावून बघितले अन् वडिलांच्या काळजात झाले धस्स| small boy death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

विहिरीत डोकावून बघितले अन् वडिलांच्या काळजात झाले धस्स

नागपूर : पतंग आणि मांजाच्या मागे धावताना नऊ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीमध्ये पडून मृत्यू (small boy death) झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी दिली होती. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह (Fell into the well) आढळल्यानंतर कुटुंब दुःखात बुडाले. आकाश ऊर्फ अंश संजय बोरकर (वय ९ रा. डवल्याची वाडी, पारडी) असे मृत मुलाचे नाव आहे.

आकाशला पंतग उडविण्याचा खुप नाद होता. त्यामुळे सतत पतंगाच्या मागे धावायचा. बुधवारी सायंकाळपासून तो घरी न आल्याने वडील आणि नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, आकाश कुठेही न सापडल्याने हरविल्याची तक्रार पारडी पोलिसांकडे देण्यात आली. पोलिसांनी त्याचा शोध घेत घराजवळील विहिरी, नाल्याची तपासणी केली. मात्र, तो आढळून आला नाही.

हेही वाचा: ‘... तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा’

आज सकाळच्या सुमारास त्याचे वडील संजय बोरकर यांनी घरामागे असलेल्या बारदान्याचा गोदामातील विहिरीत डोकावले असता त्यांच्या काळजात धस्स झाले. पाण्यावर अंशचा मृतदेह तरंगताना (small boy death) आढळून आला. ही माहिती समजताच घरात शोककळा पसरली. पोलिसानी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह (Fell into the well) बाहेर काढला. त्याच्या हातात मांजा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतग व मांजामुळे या ठिकाणी आल्यावर विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विहिरीवर होता बारदाना

मोहन राधेश्‍याम चुक यांच्या मालकीचा असलेल्या बारदान्याच्या गोदामात विहीर आहे. त्यावर लोखंडी जाळी टाकण्यात आली आहे. मात्र, विहिरीच्या एका बाजूला पाणी काढण्यासाठी जागा ठेवण्यात आली होती. ती जागाही बागदान्याने झाकून ठेवण्यात आली होती. त्यावर पाय देवून वर चढण्याच्या प्रयत्नात अंश विहिरीत पडल्याचा कयास पोलिसांनी लावला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurCrime Newsdeath
loading image
go to top