लॉकडाऊनमुळे कोरोना खरंच थांबेल? व्यापाऱ्यांचा सवाल; घंटानाद, थाळीनाद आंदोलनाचा इशारा 

Small Businessmen are still protesting against lockdown in Nagpur
Small Businessmen are still protesting against lockdown in Nagpur

नागपूर : ‘ब्रेक दि चेन'अंतर्गत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात सराफासह इतरही व्यापाऱ्यांनी आज काळे मास्क आणि काळे कपडे परिधान करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. छुपा लॉकडाउन हा कोरोना प्रतिबंधासाठी पर्याय नाही. यामुळे कोट्यवधींचे नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागत आहे. यापेक्षा अटी, नियमांसह व्यापार सुरू करण्याची परवानगी द्यावी. शासनाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी भूमिका व्यापाऱ्यांची आहे.

सराफ व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले आहे. सलून व पार्लर व्यावसायिकाने दहा एप्रिल रोजी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, घंटानाद, थाळीनाद, "मी व माझा परिवार लॉकडाऊनचा निषेध करणार आहे असे फलक घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.

६०० कोटीची उलाढाल ठप्प

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील वर्षी गुढीपाडव्यासह अनेक सण लॉकडाऊनमध्ये गेले. यंदाही छुपा लॉकडाउन लावण्यात आल्याने गुढीपाडव्याच्या दिवशीचा ५०० ते ६०० कोटीचा व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच शासनाचाही १५० कोटीचा महसूल बुडणार आहे. गुढीपाडव्याला सोने-चांदी, दागिने, फ्लॅट, चार चाकी आणि दुचाकी वाहने, सायकल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह इतरही वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

ई कॉमर्सला सूट का?

छुप्या लॉकडाऊनमध्ये पारंपारिक व्यावसायिकांना व्यापार बंद करण्याचा तुघलकी आदेश काढला आणि ई कॉमर्सला मात्र, त्यातून सूट दिली आहे. उलट यामाध्यमातूनच कोरोना घरापर्यंत पोहोचतो असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश काढले. त्यावर पुनर्विचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेतली असून दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. छुप्या लॉकडाउनऐवजी सोमवार ते शुक्रवार व्यापारास परवानगी द्यावी. शनिवार आणि रविवार लॉकडाउन करावे अशी मागणी केलेली आहे.
दीपेन अग्रवाल, 
अध्यक्ष चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड ट्रेड

"लॉकडाउन -१' मध्ये सलून व पार्लर व्यावसायिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे लॉकडाऊनचा विषय निघाला की सर्वप्रथम सलून व पार्लर व्यावसायिकांवरच्या काळजात धस्स होते. आता पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यामुळे सलून व पार्लर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांची किरायाची दुकाने आहे. एका दुकानात किमान दोन कामगार असतात. या सर्वांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना फक्त व्यापारामुळेच वाढतो का असा प्रश्नही उपस्थित केला.
-शाम आस्करकर, 
अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ (विदर्भ)

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com