esakal | आता कोव्हिड बेडची माहिती मिळणार एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार केलं सॉफ्टवेअर
sakal

बोलून बातमी शोधा

corona beds

आता कोव्हिड बेडची माहिती मिळणार एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीनं तयार केलं सॉफ्टवेअर

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना बेड मिळत नाही. अनेकजण बेडच्या शोधात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धाव घेत असून यातच बाधितांची प्रकृती खालावत आहे. आता मात्र शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

बेडसाठी नागरिकांची धावाधाव बघता मनपा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी स्मार्ट सिटीच्या ई-गव्हर्नन्स विभागाकडून कोव्हीड बेडची उपलब्धता दाखविणारे सॉफ्टवेअर तयार करून घेतले. शहरात सध्या १०७ रुग्णालयांत बेड उपलब्ध आहेत. परंतु या बेडसाठी बाधित किंवा त्यांचे नातेवाईकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागते. त्यामुळे आता मोबाईल किंवा लॅपटॉपवर एका क्लिकमध्ये विविध रुग्णालयातील ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटीलेटर बेडसचा तक्ता दिसणार आहे.

हेही वाचा - ...तर बॅकस्टेजला काम करणारे तंत्रज्ञ वळतील गुन्हेगारीकडे; कोरोनामुळे आली उपासमारीची वेळ

रुग्णालयांना सॉफ्टवेअरचे लॉगिन आईडी देण्यात आले आहे. रुग्णालयातील ऑपरेटर नवीन पेशंट किंवा रिकामे झालेल्या बेडची अद्ययावत माहिती या साफ्टवेयरवर अपडेट करणार आहे. ही माहिती नागरिकांसाठी ‘डॅशबोर्ड'वर दाखविली जाईल. त्यामुळे बाधितांच्या नातेवाईकांना गरजेनुसार रुग्णालयांमध्ये बेडसाठी धाव घेणे शक्य होणार आहे.

हे सॉफ्टवेअर स्मार्ट सिटीच्या ई-गर्व्हनेन्स टीमचे प्रोग्रामर अनूप लाहोटी यांनी तयार केले असून त्यांचे महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आयुक्त राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा - परप्रातींयामुळे जिल्ह्यातील रुग्णांना फटका; राज्यातील रुग्णांना प्राधान्य द्या : डॉ. आशिष देशमुख

इथे करा क्लिक

बेडची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in व नागपूर स्मार्ट सिटीच्या http://nsscdcl.org/covidbeds या संकेतस्थळावर क्लिक करावे लागणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

या नव्या सेवेमुळे बेडच्या शोधात फिरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका व स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर आयसीयू, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर व इतर खाटांची माहिती प्राप्त होईल.
राधाकृष्णन बी. आयुक्त, महानगरपालिका.