
नागपूर : पुन्हा ते मित्र, पुन्हा तीच मजा आणि पुन्हा तो शाळेत मिळण्याचा आनंद. विद्यार्थ्यांचा किलबिलाट, विद्यार्थ्यांची उत्सुकता, काही नवीन चेहऱ्यांच्या मनात भरलेली धडकी, शिक्षकांना भेटण्याची घाई आणि पालकांचा उत्साह या संपूर्ण वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस जल्लोषात पार पडला.