Snake Enters Tiger Enclosure: महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात नागाची घुसखोरी झाली, पण कर्मचाऱ्यांनी तात्काळ नाग बाहेर काढला. यामुळे प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात नागोबाने प्रवेश केला. कर्मचाऱ्यांना लगेच ते निदर्शनास आल्याने त्यांनी नागाला बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टळला. रविवारी पुन्हा एकदा नागोबाने मोराच्या पिंजऱ्यात प्रवेश केला.