Nagpur Crime: घरात एकटा असताना तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन
Nagpur News: कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा येथे युवराज सुमित सुभाष वासनिक (रा. सोनेगाव राजा) यांनी राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
कामठी : तालुक्यातील सोनेगाव राजा येथे एका अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १६) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.