नागपूर - जिल्हा परिषदेच्या सीईओ सौम्या शर्मा-चांडक यांनी शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी विनायक महामुनी हे जिपचे नवे सीईओ म्हणून पदभार सांभाळणार आहे.
राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश गुरुवारी(२९ ऑगस्ट) काढले़ सीईओ सौम्या शर्मा यांची बदली स्मार्ट सिटीच्या सीईओ म्हणून केली आहे. तर त्यांच्या जागी विनायक महामुनी यांची वर्णी लागली आहे. महामुनी यांची नंदूरबार उपजिल्हाधिकारी पदावरून बदली झाली आहे.