

Farmers in Ambada village face crop stress as low rainfall and falling groundwater levels threaten the rabi season.
esakal
अंबाडा : यंदा अत्यल्प पाऊस, खालावलेली भूजल पातळी आणि ऑक्टोबर संपत आला तरी थंडीचा अभाव, अशा प्रतिकूल परिस्थितीचा फटका आता रब्बी हंगामालाही बसत आहे. सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्यानंतर तुरीचे पीकही धोक्यात आले असून जमिनीत ओलावा नसल्याने चण्याची पेरणी पूर्णतः थांबली आहे. नरखेड तालुक्यातील अंबाडा परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.