
नागपूर : कोराडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या प्रकल्पांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा आज बैठकीत दिला.