

नागपूर : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. एकाच्या अंगावरून चालक गेले. तर दुसरा रुग्णालयात नेताना दगावला. आठवा मैल चौक ते नवनीतनगर टर्निंग दरम्यान सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. रमेश कारुलाल कटरे (४७) रा. १० नंबर नाका, वाडी आणि धनराज कालिचरण दरवरकर (३०) रा. छुटका, जि. शिवनी, मध्यप्रदेश अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.