नागपूर - राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील दहा लाख घरात शासन पोचविणार आहे. यातून लोकशाहीचे मूलतत्त्व व कर्तव्य तत्पर नागरिकत्वाचा पाया भक्कम होईल, असा विश्वास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या कक्षेत घेण्याची किमया भारतीय राज्यघटनेने करून दाखविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत घर-घर संविधान उपक्रमाच्या आरंभाप्रसंगी ते बोलत होते. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे उपस्थित होते.
जागतिक पातळीवर भारताने साध्य केलेले यश हे आपल्या संवैधानिक मूल्यांवर मिळाले आहे. अनेक देशांकडून भारतीय संविधानाचा अभ्यास केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाशी प्रत्येकाने कटिबद्ध होण्याचे आवाहन करून विकसित भारताचा संकल्प जाहीर केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेची उद्देशिका घराघरात पोहचविण्याचा आरंभ नागपूर जिल्ह्यातून या दीक्षाभूमीतून होत असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, बावनकुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आहे. प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी तर आभार प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी मानले.
निधीचे वाटप
शांतीवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषद - २ कोटी ४७ लाख ६७
कामठी येथील ओगावा सोसायटी - ५ कोटी ९४ लाख ८८ हजार
गुरुचरण दास स्वामी मठ पंचकमिटी नागपूर - ५२ लाख ३१ हजार
प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान - सात कोटी दोन लाख रुपये
डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित स्थळांचे होणार जतन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे समाजासाठी व युवकांसाठी सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. संविधानाची उद्देशिका युवकांनी मुखोद्गत करून त्यातील सार आपल्या जीवनात, वर्तणुकीत आणला पाहिजे. महाराष्ट्रातील जी काही महत्त्वाची ठिकाणे भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित आहेत ती स्थळे नव्या पिढीला शक्तीस्थळासारखी आहेत. या स्थळांचे जतन शासनातर्फे करण्यात येणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा दिलेला बहुमोल संदेश हा अत्यंत प्रभावी ठरला आहे. त्यांच्या या संदेशातून कोट्यवधी लोकांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन केले आहे. त्यांनी दिलेले लोकशाहीचे मूल्य देशासाठी महत्वाचे असून समाज आता जागृत झाला आहे.
-ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.