नागपूर - कोरोनामध्ये आई आणि परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वी हृदयरोगाने वडिलांचा मृत्यू झाला. याच तणावाखाली येऊन मोठ्या भावाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो उपराचासाठी रुग्णालयात दाखल झाल्याने दहावीत असलेली भक्ती खचली..मात्र, शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी तिचे पालकत्व घेत, मायबाप होत तिला धैर्य देत, दहावीचा अभ्यास घेतला. दहावीच्या निकालात तिने ७४.४० टक्के गुण मिळवित शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविला..ही कहानी आहे ती दहावीत शिकणाऱ्या भक्ती नायक हिची. कोरानाच्या लाटेत भक्तीची आई उषा देवाघरी निघून गेल्यात. दोन भावंड आणि वडील यांच्यासह ती घरात वास्तव्यास होती. मोठा भाऊ पारस बारावीत आणि त्यापेक्षा लहान नितेश अकरावी आणि भक्ती दहावीच गांधीबाग परिसरातील आदर्श विद्या मंदिर या शाळेत दहावीत शिकत होती..मात्र, अचानक परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वी वडील जीवनलाल यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांची देवाज्ञा झाली. घरात केवळ दोन भाऊ भक्ती असे तिघेच उरले. कुणीच कमावता नसल्याने मोठा भाऊ पारस याच्यावर मानसिक दडपण आल्याने त्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्याचे प्राण वाचले.मात्र, अशाही परिस्थिती न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामोरे जाऊन तिने त्याच्या सांभाळ करण्यास सुरुवात केली. एक महिना त्याच्या सेवेत निघून गेला. वडिलांनंतर घरातील सर्व जबाबदारी भक्तीच्या खांद्यावर आली. घरची कामे करून तिला शाळेत जाणे अशक्य झाले..दोन महिन्यापासून मुलगी शाळेत येत नसल्याने शिक्षकांनी तिची माहिती घेतली असता, त्यांच्यासमोर सत्य आले. शाळेने मुलीचे समुपदेश करीत तिचा शुल्कासह संपूर्ण शिक्षणाचा भार घेतला. तिचे समुपदेश करीत, दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरला. अतिरिक्त शिकवणी घेऊन अभ्यासक्रमही पूर्ण केला. यातून आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात भक्तीने ७४.४० टक्के गुणासह शिक्षकांचा विश्वास सार्थ केला..पेपरच्या दिवशीही भावाची प्रकृतीत बिघाडभक्तीने दहावीचा अभ्यास करून कसेबसे पेपर देण्यात सुरुवात केली. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्यातून वाचल्यानंतरही त्याची झळ शरीराला बसली होती. त्यामुळे पारसची ऐन परीक्षेच्या दिवशी प्रकृती बिघडली. त्याचा सांभाळ करून भक्तीने अशा मानसिकतेत पेपर दिला. निकालात तिने मिळविलेली टक्केवारी खऱ्या अर्थाने मौल्यवान आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.