जीएसटीमुळे पारदर्शकतेसोबतच महसूलही वाढला

‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात राज्य कर सहआयुक्त कमठेवाड व उपायुक्त लहाने यांचे मत
Speaking in ‘Coffee with Sakal'
Speaking in ‘Coffee with Sakal'Sakal
Updated on

नागपूर - काही वर्षांपूर्वी विखुरलेली कर प्रणाली वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून एका छताखाली आल्याने त्यात कमालीची सुसूत्रता व पारदर्शकता आली. व्यापारी व सर्वसामान्य नागरिक प्रामाणिकपणे टॅक्स व रिटर्न्स भरू लागल्याने राज्याचा महसूल वाढला. परिणामतः विकासाची गाडी वेगाने धावू लागल्याचे नागपूर विभागाचे राज्य कर सहआयुक्त (प्रशासन) डॉ. वैजनाथ कमठेवाड व उपायुक्त सुनील लहाने यांनी मंगळवारी ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात सांगितले.

दोन्ही अधिकाऱ्यांनी यावेळी जीएसटीसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनातील विविध प्रश्न व शंकांचे निरसन केले. ते म्हणाले, २००७ पूर्वी विविध प्रकारचे १७-१८ कर होते. ते सर्वत्र विखुरले होते. त्यात सुसूत्रता आणण्यासाठी व पर्यायाने महसूल वाढविण्याच्या उद्देशाने एक जुलै २००७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जीएसटीमुळे सर्व कर एकत्र होऊन एका छताखाली आले. त्याचे चांगले परिणाम पहायला मिळाले. कारण जीएसटी आल्यापासून राज्याच्या महसुलात भरमसाठ वाढ झाली असून, जीएसटीमुळे पारदर्शकतेसोबतच महसूलही वाढला विकासकामांना चालना मिळाली. त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सर्वांनाच फायदा झाला व होत आहे.

जीएसटीमुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिक नियमित रिटर्न्स भरू लागले आहेत, तर त्याचवेळी डीलर्सचीही संख्या १५ लाखांपर्यंत पोहोचली. उल्लेखनीय म्हणजे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने त्यात पारदर्शकता आली. शिवाय नागरिकांमध्ये जागरूकता वाढली. त्यामुळे साहजिकच डिफॉल्टर्सचेही प्रमाण कमी झाले. आता सप्लायरपासून सर्वच गोष्टी ट्रॅक होऊ लागल्या आहेत. या चेनमधून कुणीही सुटू शकत नाही. टॅक्स किंवा रिटर्न भरला की नाही, हे ऑनलाइन पाहता येऊ शकते. त्यावर आमचा सतत ‘वॉच’ असतो. चुकून एखाद्याने बदमाशी केली तरीही तो आमच्या कचाट्यातून सुटत नाही. अशा व्यक्तींना पकडून त्याच्याकडून नियमाप्रमाणे टॅक्स व दंड वसूल केला जातो. २०२२-२२ मध्ये ४५ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २७.७४ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, महसुलासंदर्भात बोलायचे झाल्यास, जीएसटीच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये एकूण १६९८ कोटींचा महसूल जमा झाला होता. २०२१-२२ मध्ये हा आकडा ४८ टक्क्यांनी वाढून २४९९ कोटींपर्यंत पोहोचला आहे. या विक्रमी महसुलाचे श्रेय अर्थातच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना जाते. भविष्यात करपालन (टॅक्स कंप्लायन्स) ९५ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत वाढविणे, अद्याप नोंदणी न केलेल्यांना ट्रॅक करणे तसेच खोटी माहिती देणाऱ्यांना हुडकून काढण्यासह इतरही अनेक आव्हाने असून, त्यावर यापुढे अधिकाधिक भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.

कामठेवारांची क्रीडा क्षेत्रात गरुडझेप

उच्चपदावर काम करीत असतानाच ५८ वर्षीय डॉ. कमठेवाड यांनी आपले क्रीडाप्रेमही जपले आहे. त्यांनी आतापर्यंत फ्रान्स, दुबई व दक्षिण आफ्रिकेसह देशविदेशातील जवळपास ९० अर्ध, पूर्ण व अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार पटकावले. स्पोर्ट्स हे माझे ‘पॅशन’ असून, त्यामुळे फिटनेससोबतच नवी ऊर्जादेखील मिळते. ताणतणाव कमी होत असल्याने कार्यालयीन कामात खूप फायदा होतो, असे कमठेवाड यांनी यावेळी सांगितले.

अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नागपूर विभागात आतापर्यंत २५,३४६ प्रकरणे प्रलंबित असून, त्यांच्याकडून ५३५१ कोटींची वसुली बाकी आहे. यापैकी दहा हजारांपर्यंत थकबाकी असलेली प्रकरणे निर्लेखीत करण्यात येणार आहे. उरलेल्यांनी कारवाई व दंड टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com