cyber fraud
esakal
नागपूर - देशभरात वाढत्या सायबर आर्थिक फसवणुकीमागील ‘म्युल अकाउंट’ (बनावट अथवा इतरांच्या नावाने वापरली जाणारी बँक खाती) या साखळीचा मोठा पर्दाफाश झाला असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा खातेदारांवर कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (एनसीआरपी) आणि समन्वय पोर्टलवरील ‘मनी ट्रेल’ तपासातून फसवणुकीची रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारून ती पुढे अन्य खात्यांमध्ये वर्ग (लेयरिंग) करणाऱ्या खातेदारांचा माग काढण्यात आला आहे.