
नागपर : सध्या बांधकाम क्षेत्र अनेक समस्यांना सामोरे जात आहे. नैसर्गिक वाळूचे साठे अपुरे ठरत असून किंमत वाढत आहे. यावर उपाय म्हणून नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (एनआयटी) स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुल गफ्फार यांनी संशोधन केलेल्या ‘दगड गारगोटीपासून तयार होणारा बारीक चुरा’ (स्टोन डस्ट) हा पर्याय ठरणार आहे. या विषयावर त्यांनी जयपूरच्या पूर्णिमा युनिव्हर्सिटीतून आचार्य पदवीही संपादित केली आहे.