

Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर - ‘महापालिकेच्या निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळू शकली नाही त्यांची नाराजी, राग स्वाभाविक आहे. प्रत्येक इच्छुकाला तिकीट देणे शक्य नाही. आता झाले गेले विसरून जे रिंगणात आहेत त्यांचे समर्थन मागण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मतदानाच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू,’ असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना शनिवारी सांगितले.