Success Story : रस्त्यावर झुंबर विकणाऱ्या जितेशला दहावीत ५९ टक्के; स्ट्रीटलाइटखाली तर कधी मोबाईल टार्चमध्ये केला अभ्यास
Nagpur News : रस्त्यावर झुंबर आणि टेडीबिअर विकणाऱ्या जितेशने मोबाईल टॉर्च आणि स्ट्रीटलाइटच्या उजेडात अभ्यास करत दहावीत ५९ टक्के गुण मिळवले. त्याचे हे यश रस्त्यावरील अनेक मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
नागपूर : रस्त्याच्या कडेला आई, भाऊ आणि लहान बहिणीसोबत राहणारा झुंबर विक्रेता जितेश हजारी भाटी, दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पदपथावर राहणाऱ्या रस्त्यावरील मुलांसाठी आशेचा किरण ठरला आहे.