सिंदखेड राजा : शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय लढाई संपणार नसल्याचे वक्तव्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित एल्गार मेळाव्यात मंगळवारी (ता. २७) केले. .क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील सावता भवन येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि पिक विमा मिळावा यासाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार मेळाव्यासाठी ॲड.शर्वरी तुपकर, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, बाळू शेवाळे, कैलास मेहेत्रे, आशामती मेहेत्रे, अश्विनी मेहेत्रे, आदिनाथ वानखेडे, राजाराम जाधव, बाळासाहेब जाधव,राजेंद्र मोरे, शिवहरी वाघ, लक्ष्मण मोरे, बाळासाहेब जाधव, सहदेव लाड यांच्यासह हजारो शेतकरी, महिला, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..तुपकर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण आज पर्यंत अनेक आंदोलने केली सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडले, अनेकवेळा जेलमध्ये जावे लागले, परंतु शेतकऱ्यांसाठी असलेला लढा प्रामाणिकपणे सुरू ठेवला. तालुक्यामध्ये शेडनेटचा मोठा विषय प्रलंबित आहे. शेडनेटचा पिक विम्यामध्ये समावेश झाला पाहिजेत. यासाठी मंत्रालयामध्ये स्वतंत्र बैठक लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. मागील सरकारच्या काळामध्ये शेडनेटच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती, परंतु त्यामध्ये यश आले नाही. शेडनेटच्या संदर्भामध्ये सुद्धा एक मोठा लढा उभा करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले..निवडणुकी पूर्वी राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्त केल्या जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप सरकारने या बाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने यासाठी राज्यभर मोठे आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिक विमा आजही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांनी आपल्याला साथ द्यावी या सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय थांबणार नाही, अशी ग्वाही तुपकर यांनी दिली..सरकार आणि कंपनीचे साटेलोटेपिक विमा कंपनीचे व सरकारचे साटे लोटे असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला. सरकारमधील मंत्री पिक विमा कंपनीतून पैसे घेतात त्यांचा हिस्सा ठरलेला आहे. हजारो कोटी रुपये पिक विमा जमा करतात. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करत असताना कमी पैसे वाटप करतात, काही शेतकऱ्यांना चांगला पिक विमा मिळाला त्यांचे स्वागत आहे. परंतु ज्यांना पिक विमा मिळाला नाही, त्यांच्यासाठी पिक विमा वसूल केल्याशिवाय थांबायचे नाही अशा निर्धाराने बाहेर पडायचे आहे. पिक विमा मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी मुंबई येथील एआयसी कंपनीच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांची साथ आवश्यक असल्याचे यावेळी रविकांत तुपकर यांनी बोलतांना सांगितले..किसान आर्मी तयार करणारशेतकरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गावागावांमध्ये किसान आर्मी तयार करणार असून आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर ज्या प्रमाणे आपली आर्मी लढते त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या शेतकरी तरुणांचा सहभाग असलेली किसान आर्मीची स्थापना लवकरच केली जाणार असल्याचे वक्तव्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार मोर्चा मध्ये केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.