‘चिप्स’ आणले नाही म्हणून विद्यार्थिनीला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

दुकानातून ‘चिप्स’ आणण्यास नकार दिल्याने खासगी ट्युशन टीचरने एका सहा वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याची घटना रामबाग परिसरात उघडकीस आली.

‘चिप्स’ आणले नाही म्हणून विद्यार्थिनीला मारहाण

नागपूर - जवळच्या दुकानातून ‘चिप्स’ (Chips) आणण्यास नकार दिल्याने खासगी ट्युशन टीचरने (Teacher) एका सहा वर्षांच्या मुलीला मारहाण (Beating) केल्याची घटना रामबाग परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पालकांनी इमामवाडा पोलिसांकडे तक्रार (Complaint) दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी टीचरविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

विणा रतन साळवणकर (रा.रामबाग कॉलनी ) असे ट्युशन टीचरचे नाव आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला विणा साळवणकर यांच्याकडे ट्युशन लावली. शनिवारी सकाळी ११ वाजता मुलगी ट्युशनला गेली. मुलीची आई एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याने वडील तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते. दरम्यान मुलगी घरी रडत आली.

मुलीचा एक डोळा सुजलेला आणि पाठीवरही मारल्याचे वळ पालकांना दिसून आले. त्यामुळे तिला विचारणा केली असता, टीचरने बाहेरुन चिप्स आणायला सांगितले. मात्र, त्याला नकार दिल्याने मारहाण केल्याचे चिमुकलीने सांगितले. पालकांनी टीचरचे घर गाठून त्यांना विचारणा केली. टीचरने त्यांना ‘फक्त मारले, ठार नाही केले’ असे उर्मट उत्तर दिले. त्यामुळे संतप्त पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठून टीचर विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पालकांनी केली होती बाहेर जाण्यास मनाई

काही दिवसांपूर्वी टीचरच्या घराजवळ एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे पालकांनी टीचरला मुलीला आम्ही येईस्तोवर बाहेर जाऊ देवू नका, असे सांगितले होते. याशिवाय मुलीलाही बजावले होते. मात्र, त्यानंतरही टीचरने तिला चिप्स आणण्यासाठी पाठविल्याने पालकांनी रोष व्यक्त केला.

Web Title: Student Beaten For Not Bringing Chips Crime Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurcrimestudentBeating