ना मोबाइल ना इंटरनेट, कसा करायचा ब्रीज कोर्स?

Online education
Online educationGoogle

नागपूर : कोरोनामुळे मागील वर्षी शाळा ऑनलाइन (online education) झाल्याने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ब्रीज कोर्सचा (bridge course for student) अभ्यासक्रम तयार केला. २८ जूनपासून दुसरी ते नववी विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडे मोबाईल व इंटरनेटची (mobile and internet) सुविधा नसल्याने ब्रीज कोर्स करायचा कसा असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. (student facing problem for bridge course due to lack of internet and smartphone)

Online education
रात्री जेवण केल्यानंतर पत्नीसोबत झाला वाद; रागात केला खून

कोरोनामुळे निम्म्या पेक्षाही कमी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले नाही. या विद्यार्थ्यांना त्या विषयावरील ब्रीज कोर्स शिकविण्यात यावे अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली जात होती. ती मान्य करून ४५ दिवसांचा ‘ब्रीज कोर्स' राज्य मंडळाच्या प्रत्येक शाळेत शिकविण्यासाठी शिक्षण विभागाने सुरुवात केली. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (एससीईआरटी) माध्यमातून महाराष्ट्राच्या यू-ट्यूब चॅनलवरून ब्रीज कोर्सचे ऑनलाइन प्रक्षेपण केल्या जाते. त्यामुळे सेतू अभ्यासक्रमही ऑनलाइनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. त्यासाठी विषयनिहाय शिक्षकांचे गट पाडण्यात आले. मात्र, कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण देताना, बरेच विद्यार्थी ॲन्ड्राईड मोबाईल नसल्याने शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र, अद्याप त्या सुविधा नसल्याने ‘ब्रीज कोर्स'मध्ये कसे सहभागी होणार हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे शिक्षकांना विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे ‘पीडीएफ' पाठवायचे आहेत. मात्र, ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत, त्यांना ते मिळणार कसे हा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कातही नाही हे विशेष.

७० टक्के विद्यार्थी पूर्ण शिक्षणापासून वंचित -

कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने शिकविले जात असले तरी केवळ ५० टक्केच विद्यार्थी वर्गात सामील होतात. याशिवाय त्यातील केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांनाच ऑनलाइन शिक्षण पूर्णत: मिळते, तर ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे मत शिक्षक नोंदवीत आहेत. असे असताना आता पुन्हा ऑनलाइनच्या माध्यमातूनच ‘ब्रीज कोर्स' शिकविण्यात येणार असल्याने त्याचा किती फायदा होणार याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com