
यवतमाळ : देशात नवे शिक्षण धोरण झपाट्याने अमलात आणले जात आहे. या धोरणानुसार देशभरातील विद्यार्थ्यांचा ‘माइंडसेट’ बदलण्यासाठी गुजरातमधून देशव्यापी ‘प्रेरणा उत्सव’ सुरू करण्यात आला आहे. या उत्सवातील विशेष प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. लवकरच हे विद्यार्थी वडगनगरमध्ये मुक्कामी जाणार आहेत.