
Youth Substance Abuse: खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्याच्या किमती देखील अस्मानाला भिडल्या आहेत. याकरिता काही ठिकाणी सुपारी व सुगंधित तंबाखूचा सर्रास वापर केला जातो. सडलेली आणि बारीक गोटे असलेली सुपारी तसेच सुगंधित भेसळ तंबाखूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले. मात्र संबंधित विभागाकडून ग्रामीण भागात कसल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने चिंतेची बाब झाली.