
नागपूर : समाजात काही व्यक्ती अशा असतात जी फळाची अपेक्षा न करता सतत आपले काम करीत असतात. त्यामुळे कधीकधी ते दुर्लक्षित आणि प्रसिद्धीपासून दूर राहतात. उपराजधानीतील ७९ वर्षीय योगतज्ज्ञ सुधाकर गडकरी हे अशाच व्यक्तींपैकी एक. गडकरी यांनी गेल्या २५ वर्षांत हजारो नागपूरकरांना योगाचे निःशुल्क धडे देऊन, सशक्त समाज तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.